About the course

बीज रुजे ज्ञानाचे, स्वप्न साकारेल सुसंस्कारित बाळाचे....

होय, एका सुसंस्कारीत बाळाचं तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी, सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित ‘जीवनविद्या गर्भसंस्कार कोर्स’

सुसंस्कारीत बाळाचं स्वप्न जरी तुमचं असलं, तरी नकळत ते सक्षम राष्ट्रउभारणीचं स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करणार्‍या जीवनविद्या गर्भसंस्कार कोर्सचे वेगळेपण आहे तरी काय?

हा कोर्स,

तुमच्या मनातल्या सर्वगुणसंपन्न बाळाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास योग्य दिशादर्शन करतो.

शरीररुपी दिव्य व्यवस्थेचं महत्त्व जाणून गर्भवती मातेच्या पर्यायाने बाळाच्या आरोग्याबाबत जाणकार डॉक्टरांमार्फत योग्य मार्गदर्शन करतो.

संस्कारांच्या मुळाशी असलेल्या मनाचं शास्त्र सहजसोप्या भाषेत उलगडून सांगतो.

तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणाऱ्या कृतिशील साधना शिकवत जाणीवपूर्वक संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करतो.

...आणि एका सुसंस्कारित बाळाबरोबरच नकळत सुसंस्कारित आई-बाबा सुद्धा घडवतो.

अशा अनोख्या पैलूंनी सजलेला हा जीवनविद्या गर्भसंस्कार कोर्स सक्षम राष्ट्रउभारणीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलेला आहे.

बाळाची चाहूल लागलेल्या आई-बाबांबरोबरच ही चाहूल लागावी म्हणून उत्सुक असलेल्या जोडप्यांनी सुद्धा आवर्जून करावा असा हा अनमोल कोर्स आहे.

सदर कोर्स तुम्हाला ३० दिवसांसाठी उपलब्ध केला जाईल. ह्या कालावधीत आपण हा कोर्सचा लाभ घ्यावा व तो पूर्ण करावा.

PRE-RECORDED CONTENT

Watch pre-recorded lectures at your convenience

LIVE CLASSES

Get your questions answered by Doctors and our expert Faculties

PRACTICAL

Learn practical and positive affirmation exercises

CERTIFICATE

Earn a Shareable Certificate upon completion

MARATHI

Available in Marathi language

Testimonials